“दीप अमावस्या” आणि “गुरुपुष्यामृत योग” , एकाच दिवशी त्यामुळे या गोष्टी नक्कीच करा…

। नमस्कार ।

यंदा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळेच या दिवशी काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल. मग काय आहे या दिवसाचं महत्व आणि कुठल्या गोष्टी कराव्या, चला जाणून घेऊया..

आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं. चातुर्मास पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्येकडे पाहिलं जात. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते.

भगवान शंकर, माता पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्याच्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी एक दिवा सुद्धा लावला जातो. याशिवाय दीप अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचा ही विशेष महत्त्व आहे.

योगायोगाने दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढल आहे. पंचांगानुसार यावर्षी अमावस्या तिथी आणि शनिवारी 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि ती 28 जुलैला रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी पर्यंत असेल. तर गुरुपुष्यामृत योग 28 जुलैला सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पितरांचे स्मरण करून पिंडदान केले जात.
मात्र आषाढ महिन्यातील अमावास्येला सुद्धा काही ठिकाणी पितृ तर्पण केले जात.

पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. पितरांनच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात आणि अमावसेला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात, असं मानलं जातं. ज्योतिष शास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचा खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येत, तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटल जातं. त्यामुळे हा सगळ्यात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णू सोबत ब्रहस्पती देवाची पूजा केली जाते.

या नक्षत्राचा स्वामी शनी देव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पति या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे. गुरुपुष्यामृत आला की, मौल्यवान वस्तूची खरेदी केली जाते. त्यामुळे सोनं किंवा चांदी आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडं तरी घ्यावा असं म्हटलं जातं.

कारण गुरुपुष्यामृत योगावर सोन आणि चांदी घेतली तर त्याचा लाभ आपल्याला होतो. तसेच तुम्ही कुठलाही नवीन काम सुरू करायचा असेल तर तुम्ही या योगावर सुरू करू शकता ते उत्तम मानला जात. मग या काही छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच करून बघा.

तसंच त्या दिवस आषाढ अमावस्या आली आहे, त्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ योग त्यादिवशी जुळून येत आहे. त्यामुळे त्या दिवशी साधना उपासना करून पुण्य पदरात पाडून घ्या. त्याचबरोबर आषाढ अमावस्याच्या दिवशी दिपपूजन करायला विसरू नका. घरातील सगळ्या दिव्यांची दूध-पाण्याने स्वच्छता करायला विसरू नका.

त्यांना हळद-कुंकू, अक्षता वाहून प्रज्वलित करून त्याची पूजा करा. एक छोटीशी दिव्याची ज्योत सुद्धा आपला आयुष्य उजळून टाकते. कारण मनुष्याच्या जीवनाचा उद्देश आहे की, अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि त्यासाठी दीपपूजन आषाढी अमावस्येला केल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *