। नमस्कार ।
तुम्ही टीव्हीवर किंवा समुद्री जिवांच्या संग्रहालयात शार्क नावाचा भ’यानक मासा नक्कीच पाहिला असेल. शार्क हा खूपच धो’कादायक मासा आहे, जो माणसांवर हल्ला करून त्यांना फस्तही करू शकतो. अनेक देशांतून शार्कच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात. या घटनांमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तर अनेकजण गंभीररित्या जखमी सुद्धा होतात.
नुकतंच अमेरिकेच्या एका सर्फरला निघालेल्या व्यक्तीसोबतही अशी एक घटना घडली. त्याला शार्कनं चारही बाजूंनी घेरलं, मात्र यातून तो नशिबाने बचावला. या धक्का दायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून अनेकजण हैराणही झाले आहेत.
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारा हा व्यक्ती आहे. एली मॅक्डोनल्ड्स आणि त्याची होणारी पत्नी लॉरा ईवान्स अशी त्या दोघांची नावं. ते दोघेही सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी लेने ब्रेवर्ड काउंटीच्या बीचवर गेले होते. समुद्रात उंच लाटा दिसताच एलीला सर्फिंग करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. एली समुद्रात होता तर लॉरा बीचवरुन त्याचा व्हिडिओ शूट करत होती.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, एलीला त्याच्या जवळपास काही लहान मासे दिसले. तो हे मासे अजून जवळ जाऊन निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यातच त्याची नजर शेजारीच फिरत असलेल्या शार्कवर गेली. हे पाहून एलीला मोठा धक्काच बसला. त्याने आसपास पाहिलं तर शेजारी आणखीही काही शार्क त्याच्या चारही बाजूंनी फिरत होते.
लॉरानं म्हटलं, मी एलीच्या बाजूला शार्कना बघितले आणि घाबरले आणि माझ्या मनात असा विचार आला की जोरजोरात ओरडून त्याच्याजवळ जायचं आणि त्याचा जीव वाचवायचा. मात्र, मी स्वतःला त्याठिकाणी शांत केलं आणि असा विचार केला की या अश्या परिस्थितीत काय करायला पाहिजे, हे एलीला माहिती आहे.
मला हेदेखील माहिती होतं, की अशी परिस्थिती एलीसाठी अगदीच खास असेल, त्यामुळे मी त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. एली लगेचच पोहत समुद्रातून बाहेर आला आणि त्याचा जीव वाचला. मात्र, एलीनं दुसऱ्याच दिवशी पुन्हा सर्फिंग सुरु केली. एलीच्या या व्हिडिओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.