। नमस्कार ।
पाणी जीवन आहे हे वाक्य आत्तापर्यंत आपण खुप वेळा ऐकले आहे. कारण पाण्याशिवाय आपले दररोजचे जीवन हे अशक्य आहे. एखाद्या दिवशी पाणी येणार नाही, म्हटले तरी आपली तारांबळ उडत असते. सध्या पावसाची मजा अनुभवतोय. आपण भरपूर निसर्ग फुलला आहे, बहरला आहे.
तसेच पावसामुळे होणारे हाल सुद्धा तितकेच पाहत आहोत आपण. मात्र या पावसाच्या फक्त नद्या-नाले भरण्यासाठी उपयोग होतो का?, तर नाही. कारण याचा उपयोग आपल्या आर्थिक कामे मार्गी लावण्यासाठी सुद्धा तितकाच केला जातो. मग चला तर जाणून घेऊया.
यावेळी पावसाला जोरदार सुरुवात झाली, त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली दिसून येत आहे. पावसाचं पाणी पिकांसाठी आणि इतर कामांसाठी जेवढं उपयुक्त आहे तसेच वास्तूमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात. वास्तुशास्त्रात पावसाच्या पाण्याचे असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने माणूस आपल वाढतं कर्ज सुद्धा फेडू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या, पावसाच्या पाण्याने तुमचा वाढलेलं कर्जत कसं कमी होऊ शकते.
जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नुकसान होत असेल, तर पावसाचे पाणी पितळेच्या भांड्यात गोळा करा व त्यानंतर एकादशीच्या दिवशी या पाण्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अभिषेक करावा. असं केलं होतं व्यवसायात नुकसान होणार नाही.
जर तुम्हाला वाटत असेल की, नकारात्मक ऊर्जामुळे तुम्हाला खरच या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर मग पावसाचे पाणी गोळा करून ते हनुमान समोर ठेवा आणि संपूर्ण श्रावण महिन्यात दररोज 52 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करा. त्यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागातमध्ये शिंपडा आणि होणारा बदल अनुभवा.
जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असेल, तर मग पावसाचं पाणी मातीच्या भांड्यात भरा आणि घराच्या उत्तर दिशेला ठेवा. असं केल्याने आर्थिक समस्या दूर होईल असं सांगितलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तीला आर्थिक कमतरता भासत असेल तर मग पावसाच्या पाण्याने एक वाडगा भरा आणि मग घराच्या छतावर ते ठेवा, असे केल्याने सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते.
वास्तुनुसार जर एखाद्या व्यक्तीवर कर्ज वाढत असेल, तर मग पावसाचं पाणी बाटली गोळा करा. त्यानंतर त्यात दूध टाकून देवाचे स्मरण करून महिनाभर या पाण्याने स्नान करा. असं केल्याने तुम्हाला हवं असलेलं कर्ज लगेच मिळत.
जेव्हा आपण एखाद्या प्रश्नात किंवा एखाद्या समस्या अडकतो आणि मग बाहेर मार्ग दिसत नसतो तेव्हा या छोट्या-छोट्या गोष्टी नक्की करून बघावे. तेव्हा निदान त्या एका समस्येमधून बाहेर पडण्यासाठी थोडा तरी वेळ मिळतो आणि नैराश्यामध्ये येणारे विचार हे सकारात्मक विचारांमध्ये परावर्तित होतात. कोणतीही गोष्ट श्रद्धेने केली की, मग त्याचा उपयोग होणार असतो. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करून बघा.