डॉक्टरांनी या मुलाला नवा हात लावला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव तुमच्या डोळ्यात पाणी आणतील , बघा विडिओ

। नमस्कार ।

या जगात सुखाचे मोजमाप कोणालाही करता येत नाही. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठा आनंद देऊन जाते. असं म्हणतात की, स्वतःला आनंदी ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. काही व्यक्तींकडे सारं काही असूनही ते दुःखीच राहतात आणि अगदी छोटीशी गोष्ट मिळाली तरीही त्यात त्यांना खूप मोठा आनंद होत असतो.

सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालासुद्धा सकारात्मकता नक्कीच येईल आणि तुम्हाला कितीही कठीण परिस्थितीत आनंदी कसं राहायचं हे देखील यातून शिकायला मिळेल.

हा व्हिडीओ EB30X Fitness Studio नावाच्या फेसबुक पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघून कुणाला तरी वाटेल की यात अश्रू ढाळण्यासारखं काय आहे, पण जे लोक हा व्हायरल व्हिडीओ बघून नक्कीच तुमच्यादेखील डोळ्यात पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दिसत आहे ज्याला एक हात नाहीय. एक डॉक्टर या मुलाला प्रोस्थेटिक हात लावताना दिसून येत आहे. हे पाहून या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात ही मावेना. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

डॉक्टरांनी हे बनावट हात लावल्यानंतर मुलाचे दोन्ही हात समोर ठेवताच ते बघून तो लहान मुलगा खूपच खुश होतो. तो आपल्या खऱ्या हाताने बनावट हाताला स्पर्श करतो आणि इतक्या जोरात हसतो की त्याचं हसणे पाहून अनेकांना आपलं मोठे दु:ख अगदी लहानच आहे असं वाटतं.

फेसबुकवर व्हिडीओ होतोय व्हिडीओ :- या व्हिडीओला ८० लाखांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांनी याला लाइकदेखील केलं आहे आणि हजारो लोकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

लोकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कमेंट्स वाचल्यानंतर हा व्हिडीओ जवळपास सर्वांच्याच मनाला भिडल्याचं दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य पाहून प्रत्येकजण मुलाला आशीर्वाद देत आहे. एका युजरने कमेंट केलीय की, “मला आनंद आहे की मुलाला हात मिळाला आणि आमच्या मुलांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा मला अभिमान आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *