डान्स करतानाच युवकाच्या पाठीवर चढली तरुणी; जरा पुढे जाऊन गेला तोल …. बघा विडिओ

। नमस्कार ।

सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो ,विडिओ वायरल होत असतात. त्यात कपल डान्सचे व्हिडिओ बरेचदा व्हायरल होत राहतात आणि ते लोकांना आवडतात सुद्धा. त्या डान्स मध्ये त्या कपलची केमिस्ट्री, बॅलन्स आणि प्रेम पाहण्यासारखं असतं.

मात्र, जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की कोणतीही व्यक्ती प्रत्येक गोष्टीत 100 टक्के परफेक्ट नसतो. असंच काहीसं या डान्सच्या बाबतीतही झालं आहे. तुम्हाला खूप चांगला डान्स येत असला तरीही अनेकदा तुमच्याकडून चुका होणं सहाजिकच आहे. सध्या एका कपलचा असाच मजेशीर डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका कार्यक्रमातील डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल हसत-खेळतं कार्यक्रमात प्रवेश करतं. दोघंही अगदी मजेत लोकांसमोर डान्स करत असतात. त्यांची केमिस्ट्री तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच आवडते. मात्र, काही वेळातच डान्स करणारं हे कपल जास्तच उत्साही होतं आणि तरुणी डान्स करता करताच अचानक युवकाच्या पाठीवर चढते. पुढे जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे.

तरुणी पाठीवर चढल्यानंतर काही वेळ हा मुलगा स्वतःला बॅलन्स करतो. मात्र, तो युवती पाठीवर असतानाही मजेत डान्स करत राहतो. इतक्यात त्याचा बॅलन्स बिघडतो आणि दोघंही धाडकन खाली कोसळतात. हा व्हायरल डान्स व्हिडिओ आतापर्यंत 94 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कपलची अवस्था पाहून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बघा विडिओ :- 

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *