। नमस्कार ।
सध्या सोशल मीडियावर व्हायरल एका छोट्या मुलीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या छोट्या मुलीने एअरपोर्टवर एका सुरक्षा रक्षकाला विनंती करून ती पुढे दिली. या मुलीने केलेली ही गोंडसरीत्या विनंती पाहून सोशल मीडियावर पाहणाऱ्यांचे मन जिंकल आहे.
एअरपोर्टवरील या चिमुकलीने सर्वाचं मन जिंकून घेतल आहे. तिच्या या निरागसपणामुळे त्या सुरक्षारकर्मीचं सुद्धा मन पिघळून गेलं आणि या चिमुकलीने केलेल्या विनंतीला त्यांना परवानगी द्यावी लागली. तेथील ते दृश्य पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे मात्र नक्की…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लाल रंगाचा आकर्षक फ्रॉक परिधान केलेली एक चिमुकली दिसून येते आहे. एअरपोर्टमध्ये चेक पॉईंटच्या पुढे गेल्यानंतर ही चिमुकलीला पुन्हा एकदा मागे जात असल्याचं दिसून येत आहे. पण जवळच एअरपोर्टवरील सुरक्षाकर्मी उभा असल्याचं पाहून ती पुन्हा मागे जाण्याचा विचार करताना दिसून येत आहे.
एकदा एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर जाता येत नाही हे या चिमुकलीला सुद्धा कळतंय, हे नवल. यासाठी ती आपल्या बोबड्या चालीत एकदा बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याची विनंती ही चिमुकली करताना दिसून येते.
एअरपोर्ट बाहेर उभी असलेल्या तिच्या मावशीला तिला एकदा घट्ट मिठी मारायची होती. हे पाहून त्या सुरक्षारक्षकाचं मन पिघळलं आणि त्याने या चिमुकलीला बाहेर जाण्याची परवानगी दिली.
एअरपोर्टवरील सुरक्षारक्षकाने आपल्याला मावशीला भेटण्यासाठी परवानगी दिल्यानंतर ही चिमुकली लगचेचच आपल्या छोट्या पावलांनी तुरुतुरू धावत आपल्या मावशीकडे गेली. मावशी सुद्धा तिच्याकडे येत असताना या चिमुकलीने तिच्या मावशीला घट्ट मिठी मारली.
She asked the officer permission to say goodbye to her aunt at the airport. pic.twitter.com/bcsb9rnxt6
— Kaptan Hindustan™ (@KaptanHindostan) October 14, 2021
हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूपच भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ कतार मधल्या हमद इंटरनॅशनल एअरपोर्टमधला असल्याचं सांगितलं जातंय. मात्र हा व्हिडीओ कधी कॅप्चर केला गेलाय, याबाबत मात्र कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.