। नमस्कार ।
तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्रात सध्या पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. आणि त्यामुळे खूप नुकसान होत आहे. पण इतक्या पावसात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी त्यांचे काम चोख पार पाडत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की दोन आरोग्य सेविका ह्या वातावरणात चिखलाची वाट तुडवत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी जात आहेत.
सध्या, हर घर दस्तक ही मोहीम राबवली जात आहे व तसेच लहान मुलांचे लसीकरण व इतर माध्यमातून कोरोनाच्या विरोधात आखणी केली जात आहे. कोल्हापुरातील आजरा तालुक्यात भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पेरणोली उपकेंद्र आहे.
या उपकेंद्रात शंभरहून अधिक धनगरवाडी येतात.त्यामुळे इकडून पायीच जावे लागते आणि सध्या असलेले पावसाचे वातावरण त्यामुळे आजूंच अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी सुद्धा लक्ष्मी जाधव, डी. एस. गोविलकर, रेखा दोरुगडे आणि पी.आर. नाईक या महिला धनगरवाड्यातील लहान मुलांच्या लसीकरणासाठी झटत आहेत.
सततच्या कोसळणाऱ्या पावसातही घरोघरी जात लसीकरण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आरोग्य सेविकांचा व्हिडिओ सध्या सोशळ मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.#Kolhapur #coronavaccination #heathworker pic.twitter.com/Z3B2jzP1CS
— SakalMedia (@SakalMediaNews) July 13, 2022
या महिला कर्मचार्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात यांचे कौतुक करत आहेत. तसे त्यांचे कार्याचं खूप कौतुकास्पद आहे. या महिला जंगलातून तब्बल साडेतीन ते चार किलोमीटरचा प्रवास करून आपले कर्तव्य बजावत आहेत. यांच्या कार्याला सलामी आहे.