चित्तथरारक ! संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होत, मांजर कुटुंबाला वाचविण्यासाठी विषारी नागासोबत देत राहिली झुंज, वाचा पुढे नेमकं काय झालं

नमस्कार…

सध्या काही न काही रोज कुठे ना कुठे काहीतरी घट’ना घडतच असतात. जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा या गावातील ही हृदयाचा थरकाप उडवणारी घ’टना समोर आली आहे. मध्यरात्री घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, घरात शिरलेल्या चार फुटी विषारी सापाशी त्या घरात असणाऱ्या एका पाळीव मांजरीनं तब्बल अर्धा तास त्या सापाशी लढा दिला आहे.

त्या मांजरीच्या सतर्कतेमुळे घरात झोपलेल्या कुटुंबाचे प्राण वाचले नाहीतर त्या घरात मोठा अनर्थ  घडला असता. त्या मांजरीने आपल्या अंगावरचे सगळे केस उभे करत आपल्या पंजाच्या साहाय्याने त्या सापाचा रस्ता अडवून धरला होता. दरम्यान सापाने देखील मांजरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या त्या भयाण शांततेत सापाच्या फुसकटण्याचा आवाज घरात सर्वत्र घुमत होता.

पिंप्राळा गावातील रहिवासी असणाऱ्या प्रशांत कोळी यांच्या घरात बुधवारी मध्यरात्री तीन ते चार फुटाच्या सापाने घरात शिरला होता. पण घरातील पाळीव मांजरीनं त्या सापाचा रस्ता अडवून धरला. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जाग आली आणि ते ही खूप घाबरले. घरात साप शिरल्याच समजताच कोळी कुटुंबांनी शेजारी राहणाऱ्या सर्प मित्राला त्वरित बोलावून त्या सापाला पकडण्यात आलं आहे.

काळ बनून कोळी कुटुंबाच्या घरात शिरलेल्या त्या वि’षारी सापाशी एकटीने लढा देऊन त्या मांजरीने एकप्रकारे कुटुंबाचे प्राणच वाचवले आहेत. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. दरम्यान घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. तेव्हा अनंत कोळी यांच्या मुलाला घरात त्या सापाच्या फुस्कटण्याचा आवाज आला. पहिल्यांदा त्या मुलाने झोपेत असल्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण त्या रात्रीच्या भयाण शांततेत त्या सापाच्या फुस्कटण्याचा आवाज येत होता.

तेव्हा उठून आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिलं असता, कोळी यांच्या मुलाचा काळजाचा ठोका चुकला. घरातील पाळीव मांजर एका तीन ते चार फुट लांबीच्या विषारी सापाशी ल’ढा देत असल्याचं त्याने पाहिले. यानंतर त्याने घरातील अन्य सदस्यांना उठवलं. यानंतर घरातील सदस्यांनी सर्पमित्राला बोलावून सापाला पकडलं आहे. यानंतर त्या सापाची सुरक्षित ठिकाणी सुटका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *