। नमस्कार ।
असा कोणताच जीव नाही जो मगरीला घाबरत नाही. अगदी पाण्यातील छोट्या मोठ्या किडे-माशांपासून ते माणसांपर्यंत सर्वजण घाबरतात. खाण्याच्या शोधात असलेल्या या मगरीने माशाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हाच डाव त्या मगरीवरच पलटला आणि स्वत:च त्या माशाची शिकार झाली. या मगरीला एका माशासमोर आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे.
सोशल मीडियावर हा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर आणि मासा एकदम बाजू बाजूला दिसत आहेत. ही मगर माशाची शिकार कऱण्याच्या प्रयत्नात आहे. मासा आपलं तोंड पाण्याच्या वर काढतो तेव्हाच मगर या माशाची शिकार करायला झडप घालते.
तेव्हा या मगरीलाच 860 व्होल्टचा झटका लागतो. या मगरीला माशाचा करंट लागल्याने ती जीव वाचवण्यासाठी तडफडते. माशाची शिकार करण्याचा नाद या मगरीला महागात पडला. या मगरीलाच आपला जीव गमवण्याची वेळ आली. माशाचा करंट बसल्याने मगरीनं आपला जीव सोडला.
मगर ज्या माशाला एक सामान्य मासा समजत होती तिथेच ही मगर फसली. हा मासा विशिष्ट प्रजातिचा होता. ईल नावाच्या या माशामध्ये 860 व्होल्ट करंट येतो असं सांगितलं जात आहे. या माशाचं ते वैशिष्ट्य आहे. या माशाची शिकार करण्याच्या नादात मगरीला आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये या माशाचा देखील शेवटी मृत्यू होतो असं दिसतं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत 8 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या व्हिडीओची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
बघा विडिओ :-
#Alligator bites a large #Eel.#Eel produces nearly #860V of #electric_shock.
This #electrocutes the #Alligator and #locks its jaw. #Both #Die.@ParveenKaswan @susantananda3 @SudhaRamenIFS @NaveedIRS @ForestDeptt pic.twitter.com/TSaJw7IVNj
— Rupin Sharma IPS (@rupin1992) September 26, 2021