व्हायरल व्हिडिओ :- या व्हिडिओत एक आजी असं काही करत आहे जे बघुन तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. आजीने पुलावरून गंगा नदीत उडी मारली.
सोशल मीडियावर दिवसाला अनेक व्हिडिओ अपलोड केले जातात आणि कित्येक व्हिडिओ वायरलही होतात. तसाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास बसत नाही.
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ गंगा नदीत उंचावरून उडी मारणाऱ्या आजीशी संबंधित आहे. त्यांचे वय ७० च्या पुढे असेल, पण वयालाही लाज वाटावी, असा स्टंटबाजीचा पराक्रम केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक आजी पुलावरून गंगा नदीत उडी मारते आणि नंतर जोरदार पोहते.
गंगा नदीत आजीची उडी :- व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरिद्वारच्या हर की पौडी येथे आजी गंगा नदीच्या पुलावरून कशी उडी मारते. सुरुवातीला ती हळूहळू पुलावर चढते आणि नंतर गंगेत उडी मारते.
तिचे वय आणि स्थिती पाहून ती अशी उडी मारू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. आजी जेव्हा गंगेत उडी मारण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला पाहणाऱ्या लोकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमते.
आजी हेडलाईन बनत आहेत :- ज्या वयात माणसांना नीट बसता येत नाही, त्या वयात आजी तरुणासारखी पुलावर उड्या मारत असतात. हा व्हिडीओ असा आहे की तो पाहणाऱ्यांचाही श्वास क्षणभर थांबतो. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आजी मूळच्या हरियाणातील जिंद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आजीचा हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे. आतापर्यंत या विडिओला अनेक लाईक्स आलेल्या आहेत. तसेच लोकं या व्हिडिओला अनेक कमेंट्स करत आहेत.