क्रेन नाही तर गावकऱ्यांनी 70 फूट खोल दरीतून खेचून काढला ट्रक, वाचवला ८ जनांचा जीव, पहा Video….

नमस्कार..

एखादा अपघा’त घडला की त्या घट’नास्थळी तेथील लोक, संपूर्ण गाव जमा होतं , हे काही नवीन नाही. त्या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामस्थ अपघा’त झालेल्यांच्या बचा’वकार्यासाठी संबंधित यंत्रणेलाही बोलवतात. पण संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी मिळून बचा’वकार्य केल्याचं कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का?

कदाचित पाहिलंही असावं ते पण फक्त चित्रपटातच. जिथं गाव एकत्र येऊन अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात. एखादी चित्रपटाची स्टोरी वाटावी अशीच घट’ना नागालँडमध्ये प्रत्यक्षात घडली आहे. जिथं दरीत कोसळलेल्या ट्रकला संपूर्ण गावाने एकत्र येऊन बाहेर काढलं आहे. त्यामुळे तब्बल ८ जणांचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागालँडमधील दिमापूरमध्ये  एका मालवाहतूक ट्रकचा अपघा’त झाला. ड्रायव्हरच ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ७० फूट खोल दरीत कोसळला. फेक (Phek) जिल्ह्यातील कुस्तापो गावातील गावकऱ्यांना या अपघा’ताची माहिती मिळताच त्यांनी घट’नास्थळी त्वरित धाव घेतली. पण तिथं येऊन ते फक्त पाहत आणि त्यावर वायफळ चर्चा करत राहिले नाही तर त्यांनी बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ट्रकला दरीतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले.

व्हिडीओत पाहू शकाल की ग्रामस्थांनी बांबू, दोरीचा वापर करून त्या ट्रकला बांधला आणि सर्वजण एकत्र येत त्या ट्रक ला दरीतून खेचून बाहेर काढला. एकमेकांना ते प्रोत्साहीत करतानाही दिसले. नागालँडमधील भाजप नेते महोनलुमो किकोन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत.

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अबू मेहता यांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे पण वेगळ्या हेतूने. नागालँडच्या त्या ग्रामस्थांच त्यांनी खूप कौतुक केलं आहे.

दरीत कोसळलेला ट्रकला बाहेर काढण्यासाठी पुरेशा मशीन्स नसल्यानं तेथील ग्रामस्थांनीच आपल्या खांद्यावर त्याची जबाबदारी घेतली आणि ती यशस्वीही केली. गाव करील ते राव काय करील असं म्हणतात ना. ते इथं प्रत्यक्षात दिसून आलं आहे. एकिचं बळ काय असतं ते दाखवून दिलं आहे.

बघा विडिओ इथे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *