। नमस्कार ।
क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी अशा विचित्र घटना घडत असतात ज्याची कोणी कधी अपेक्षाही केली नसेल. काही घटना या मजेशीर असतात तर काही गंभीर. अशीच एक मनोरंजक घटना कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) 2021 मध्या पाहायला मिळाली. जेव्हा एक न बोलावलेला पाहुणा मैदानावर आला. या पाहुण्याची एन्ट्री कॅमेऱ्यात कैद झाली.
सेंट किट्स एंड नेविस पॅट्रीअट आणि गुयाना आमेजन वॉरियर्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्या दरम्यान अचानक मैदानात एक कोंबडा आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
सीपीएल 2021 च्या 8 व्या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस पैट्रीअट बॅटींग करत असताना 10 व्या ओव्हरमध्ये मैदानात कोंबडा शिरला. बराच वेळ तो मैदानात फिरताना दिसला.
सीपीएल 2021 ने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. आणि लोकांच्याही मजेशीर कमेंट येत आहेत.
बघा विडिओ :-
Pitch invader 🐓#SKNPvGAW #CPL21 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/UzG1HO5dgR
— CPL T20 (@CPL) August 29, 2021