। नमस्कार ।
सध्या पावसाचे वातावरण जास्तच आहे. नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका लहान मुलाचे प्राण तरुणींनी वाचवले आहेत. तरुणींने हिम्मत दाखवून आपल्याकडील ओढण्यांचा एक लांबच्या लांब दोर बनवला आणि या चिमुकल्याला नदीच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. बीडमधील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात जास्तच व्हायरल होत असून या धाडसी मुलींचं सर्वत्र कौतुक होत आहे.
आई-वडिलां बरोबर आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिर, बुट्टेनाथ डोंगर परिसरात हा मुलगा आला होता. यावेळी हा 10 वर्षीय मुलगा नदीच्या पत्रात उतरला. मात्र त्याला त्या नदीच्या पाण्याचा अंदाज नाही आला. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मुलगा पाण्यातच अडकला. हे निदर्शनास आल्यावर त्याच्या आई- वडिलांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पण पाण्याचा प्रवाह जोरात होता तसेच नदीची खोली किती आहे याचा अंदाज नसल्याने वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित सुलभा सोळंके या युवतीने प्रसंगावधान बाळगुन स्वतः पाण्यात उतरली.
सुळभा सोळंके या तरुणीने आपल्या इतर मैत्रिणींच्या ओढण्या एकत्र केल्या आणि त्यांचा एक दोर बनवला. यानंतर या दोराच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने त्या बालकाचे प्राण वाचविले. हा प्रकार आज दुपारी वाण नदीच्या पात्रात घडला.
बघा विडिओ :-
नदीच्या पाण्यात वाहून जात होता मुलगा, तरुणींने वाचवले प्राण pic.twitter.com/3rmIT3JtrE
— News18Lokmat (@News18lokmat) September 19, 2021