। नमस्कार ।
तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल , लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. या चिमुकल्या चिमुकल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरच गोड स्मितहास्यानं जगातील मोठ-मोठ्या दुःखाचा थोड्या वेळासाठी तरी विसर पडतो. मुलांच्या छोट-छोट्या कारनाम्यामुळे जगातला कोणताही भेदाभेद टिकत नाही.
सोशल मीडियावर याच संबंधी एक व्हिडिओ अत्यंत वायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही याचा प्रत्यय येईल. तुम्ही वायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की , एक महामार्गावर एक स्त्री एका गरीब मुलाचे प्रेमाने गाल ओढत आहे व नंतर ती त्याच्या डोळ्यात फुंकर मारत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही खूप छान वाटेल व त्या स्त्रीचे कौतुक देखील वाटेल.
आपला चांगलेपणा किंवा दयाळूपणा दाखवण्यासाठी नेहमी पैश्यांची मदत करावी नाही लागत हे ट्विटर यूजर डॉ. अजयिता यांनी हे जगाला दाखवलं आहे. १० जून रोजी डॉ.अजयिता बाईकवरून प्रवास करत होत्या, त्यांनी त्यांची गाडी सिग्नल असल्यामुळे थांबवली होती. नंतर एक लहान गरीब मुलगा त्यांच्या जवळ आला आणि पैसे मागू लागला.
नंतर तुम्ही बघू शकता की त्या मुलाच्या डोळ्यात काहीतरी जातं व त्यामुळे तो इकडे तिकडे पाहू लागतो. हे पाहिल्यानंतर डॉ.अजयिता त्या गरीब मुलाला जवळ घेतात आणि त्याच्या डोळ्यातला कचरा फुंकर मारून काढण्याचा प्रयत्न करतात. हे बघून तो लहान मुलगा खुश होतो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं असं स्मित हास्य आलं. त्या लहान निरागस मुलाला पाहून त्या त्याला काही पैसे देतात. त्यांनी दिलेले पैसे पाहून तो मुलगा खुश होतो आणि तिकडून निघून जातो.
हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी कमी करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुल शेयर ही केला जात आहे.या व्हिडिओला दर्शकांनी खुल प्रतिसात दिलेला आहे.
लोकांनी ह्या व्हिडिओला खूप पसंत केलेले आहे. आतापर्यंत ह्या व्हिडिओला १दशलक्ष पेक्षाही जास्त व्युझ आलेले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकं खूप भावुक झालेली आहेत. काहीचं असं म्हणणे आहे की, त्या महिलेने त्या मुलाच्या डोळ्यात फुंकर मारून श्रीमंत आणि गरीब यांच्यातलं अंतर कमी केलंय जणू.या महिलेने या व्हिडीओच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या हृदयालाच स्पर्श केला आहे.
It doesn't cost much to be kind… pic.twitter.com/Bykv1kqJUE
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) June 10, 2022
या व्हिडिओवर अनेक कंमेंट आलेल्या आहेत. एका यूजरने लिहलं “महिलेचा दयाळूपणा आवडला, पण ते गाल खेचणं जर हिंसक होते”. तर एकाने लिहिलं “जोरजोरात गाल ओढणे सोडलं तर बाकीचं दृश्य हे खूपच सुंदर होतं”.