। नमस्कार ।
व्हायरल व्हिडिओ : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याचे कान ओढताना दिसत आहे. मग त्यात गाय येते आणि वेदनेने ओरडणाऱ्या कुत्र्याला वाचवते.
व्हायरल व्हिडीओ : सोशल मीडियावर अनेकदा लोक प्राण्यांना मदत करतानाचे आणि त्यांना खायला घालतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक लोक असहाय्य प्राण्यांच्या मदतीसाठी आवाहन करताना दिसत आहेत. त्याचवेळी काही मानसिक विकृत लोक प्राण्यांचा छळ करताना दिसत आहेत.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याचा कान ओढून त्रास देताना दिसला. मात्र, या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीला त्याच्या वाईट कर्माची फळे लगेचच मिळतात, जेव्हा एक गाय कुत्र्याला दुखावल्याची शिक्षा देत त्याला शिंगाने उचलून मारते.
भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्याने ‘कर्म’ असे कॅप्शनही दिले आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्यापासून, या व्हिडिओला १ लाख ८९ हजारांहून अधिक दृश्ये आणि ४ हजार ७०० हून अधिक ‘रिट्विट्स’ मिळाले आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक कुत्र्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा निषेध करत आहेत. प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘एका प्राण्याच्या, दुसऱ्या प्राण्याला वेदना समजल्या.. तर आजूबाजूला उभे असलेले लोक काहीच करू शकत नाहीत.’