। नमस्कार ।
लहान आणि गोंडस पिल्लांचे व्हिडिओ कोणाला आवडत नाहीत अस होत नाही. जर तुम्ही देखील कुत्रा प्रेमी असाल, म्हणजेच तुम्हाला कुत्र्यांची पिल्ले देखील आवडत असतील, तर तुमच्यासाठी हा एक चांगला व्हिडिओ आहे, ट्विटर अकाउंट @hopkinsBRFC21 ने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ज्यात एक व्यक्ती कुत्र्याच्या पिल्लांना पोहायला शिकवत आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, एक माणूस पाण्याच्या तलावात उभा होता, तेथील पिल्लांना एक एक करून पोहायला शिकवत होता. तो माणूस पिल्लांवर लक्ष ठेवायचा आणि त्यांना दुसऱ्या बाजूला जाण्यापासून रोखत होता. कुत्र्याची पिल्ले तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एका स्त्रीला प्रोत्साहन देताना आणि “येस, गुड जॉब” म्हणताना ऐकू शकता.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सर्वात सुंदर पोहण्याचा धडा.” हा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना व्हिडिओ खूप आवडत आहे आणि व्हिडिओवर खूप कमेंट देखील करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- “मी त्यांच्यावर प्रेम करतो.” दुसऱ्याने लिहिले – खूप गोड.
बघा विडिओ :-
The cutest swimming lesson ever 😍❤️ pic.twitter.com/BXjELj2yzf
— ❤️ A page to make you smile ❤️ (@hopkinsBRFC21) September 11, 2021