|| नमस्कार ||
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. काही व्हिडिओ आपल्याला आनंद देतात, काही धक्कादायक असतात तर काही आपल्याला खूप काही शिकवून जातात.
पण सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे व्हिडिओ खूप पसंत केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. वायरल व्हिडिओ हा किंग कोब्रा आणि जंगलाचा राजा सिंह यांच्यातील भांडणाचा आहे.
जंगलाचा राजा सिंह आणि साक्षात ज्याला किंग म्हटलं जातं त्या दोघांचं जर एकमेकांसोबत भांडण झालं तर काय झालं असेल याची कल्पना करा. दोघेही जंगलातले सर्वात भयानक प्राणी आहेत. एक विषारी आहे, तर एक बलाढ्य आहे. म्हणूनच यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे.
या दोन खतरनाक प्राण्यांमध्ये नक्की कोण उजवं ठरलं हे जाणून घेण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ बघा. या दोन प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच वायरल होत असतात.
परंतु त्यात ही दोघं यांच्याहून कमकुवत प्राण्यांची शिकार करत असतात. पण हा व्हिडिओ दोन भयानक आणि शिकारी असलेल्या प्राण्यांमधील भांडणाचा असल्याने हा खूपच वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या दोघांची मारामारी एवढी झाली की त्यांच्यातलं कोणीच मागे हटायला तयार नाही. दोघं एकमेकांवर तुटून पडली आहेत.
हा खतरनाक व्हिडिओ यूट्यूबवरून शेयर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ ४ महिन्यांपूर्वी Reptile’s story या यूट्यूब अकाऊंटवरून शेयर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २१७ हजारांहून अधिक व्युज मिळालेल्या आहेत.
तसेच या व्हिडिओला अनेक कॉमेंट्सही मिळत आहेत. एकाने कॉमेंट मध्ये लिहिलं की, सिंह जिंकावा अशी माझी इच्छा होती. तर अनेक जण सांगत आहेत की, तो किंग कोब्रा नसून तो पायथन प्रजातीचा साप आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला नक्कीच कळवा.