। नमस्कार ।
आपल्या आसपास अश्या बर्याच गोष्टी घडत असतात, ज्यांचा बारकाइने विचार केल्यास त्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. खरं तर, अशा असामान्य गोष्टींमागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका असामान्य गोष्टीबद्दल सांगणार आहोत. आपण जळत असलेल्या अग्निची सावली कधी पाहिली आहे का…? आपले उत्तर ‘नाही’ असेच असेल. पण असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का…?
कारण आपल्याला शाळेत असतानाच सांगितलं होतं की, प्रकाशातल्या प्रत्येक गोष्टीची छाया असते. तर मग असे अग्नी सोबत का होत नाही. आपण यामागचे योग्य कारण जाणून घेऊयात.
जळत्या प्रकाशाच्या मागे उभे राहून आपण आपली छाया बघू शकतो. एवढेच नाही तर अग्नीशिवाय इतर सर्व वस्तूंची छाया आपण पाहू शकतो. तुम्ही केवळ माचीसची एक काडी घ्या, त्याचीहि सावली असते. पण जर आपण त्यास जाळलात, तर त्या पासून निघणार्या अग्नीचे प्रतिबिंब आपणास दिसत नाही.
तुम्ही हवे असल्यास प्रयत्न करून पाहू शकता. जेव्हा आपण माचीसची काडी जाळतो, तेव्हा त्यापासून निघणार्या धुराची छाया तर दिसते, परंतु अग्नीचे प्रतिबिंब दिसत नाही. असेच काहीसे मेणबत्ती सोबतही आहे. आपण मेणबत्ती पेटवल्यानंतर नंतर दुसरा प्रकाश आणून त्यात जळत असलेल्या मेंबात्तीचे प्रतिबिंब पाहू शकता. परंतु मेंबात्तीच्या “ज्योतिचे ” प्रतिबिंब आपणास दिसणार नाही.
चला जाणून घेऊयात, काय आहे यामागचे कारण. वास्तविकता, विज्ञान म्हणतो की, माचीस किंवा मेणबत्ती ची आग ही स्वतः एक प्रकाश आहे. अशा प्रकारे, जर ते इतर प्रकाशात घेऊन गेलात, तर ते सावली दाखवत नाही. कारण ते एकाच प्रकारचे दोन घटक आहेत.
जर तुम्हाला माचीसच्या अग्नीचे किंवा मेंबात्तीच्या ज्योतचे प्रतिबिंब पहायचे असेल, तर त्यास आपणाला त्यांच्या प्रकाशापेक्षाही तीव्र प्रकाशा समोर आणावे लागेल. अशा प्रकारे, जर आपण सूर्यप्रकाशात ज्वलन मेणबत्ती पाहत असाल, तर भिंतीवर किंवा जमिनीवर जळत असलेली ज्योत पाहू शकाल.