काय तुम्हाला माहीत आहे का ? रेल्वेस्थानकाच्या शेवटी जंक्शन, सेंट्रल किंवा टर्मिनस का लिहितात ? जाणून घ्या इथे

। नमस्कार ।

आपल्यापैकी जवळ जवळ सर्वानीच रेल्वेने कधी ना कधी प्रवास केलाच असेल. पण आपण कधी विचार केला आहे कि रेल्वे स्थानकाच्या शेवटी जंक्शन, सेंट्रल, किंवा टर्मिनस का लिहलं जाते. जर तुम्ही याचा विचार केला नसेल किंवा तुम्हाला उत्तर जाणुन घ्यायचं असेल तर या गोष्टीचं उत्तर देण्याआधी आम्ही तुम्हाला काही रेल्वेसेवेची वैशिष्ट्ये सांगतो.

भारतीय रेल्वेच्या जाळ्याला (Network) जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. भारतीय रेल्वेमार्ग ९२,०८१ किलोमीटर लांब इतक्या अंतरावर विस्तारलेला आहे. जे देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडण्यात मदत करते. भारतीय रेल्वे एका दिवसात ६६,६८७ किलोमीटर अंतर पार करते. पण आज आपण या गोष्टींवर नाही तर रेल्वे स्थानकाच्या शेवटी जंक्शन, सेंट्रल, किंवा टर्मिनस का लिहलं जाते याबद्दल अधिक उलगडून सांगणार आहोत.

टर्मिनस :- सगळ्यात पहिले जर कोणत्याही रेल्वे स्थानकाच्या नावाच्या शेवटी टर्मिनस असं लिहलं असेल तर त्या स्थानकापुढे रेल्वे ट्रैक्स नाहीत असा त्याचा अर्थ होतो, म्हणजेच ट्रेन ज्या ठिकाणाहून येईल पुन्हा त्याच ठिकाणी ती जाईल.टर्मिनसला टर्मिनल असेही म्हणतात. आपल्या माहितीसाठी, देशात २७ रेल्वे स्थानकावर टर्मिनस लिहलेले असुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस देशातील सगळ्यात मोठी टर्मिनस स्थानके आहेत.

सेंट्रल :- चला आपणास सांगतो, रेल्वे स्थानकाच्या नावाच्या शेवटी सेंट्रल हा शब्द का लिहला जातो. रेल्वे स्थानकाच्या नावाच्या शेवटी सेंट्रल शब्द लिहण्याचा अर्थ असा आहे की त्या शहरामध्ये एकापेक्षा अधिक रेल्वे स्थानके आहेत. ज्या रेल्वे स्थानकाच्या नावाच्या शेवटी सेंट्रल शब्द लिहला जातो, ते स्थानक शहरातील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे/असते.

रेल्वे स्थानकाच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहण्याचा दुसरा अर्थ म्हणजे ते स्थानक शहरातील सर्वात वर्दळीचे स्थानक असते सध्याच्या काळात भारतामध्ये मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मेंगलोर सेंट्रल, कानपूर सेंट्रल ही काही प्रमुख सेंट्रल स्थानके आहेत.

जंक्शन :- चला आपणास सांगतो की रेल्वे स्थानकाच्या नावाच्या शेवटी जंक्शन असे का लिहले जाते? कोणत्याही स्थानकाच्या शेवटी जंक्शन लिहण्याचा अर्थ म्हणजे त्या स्थानकावर गाडी येण्या-जाण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त अधिक मार्ग आहेत. म्हणजेच एका मार्गावरून गाडी येऊ शकते आणि बाकी दोन मार्गावरून गाडी जाऊ शकते त्यामुळे अशा स्थानकांंच्या नावाच्या शेवटी “जंक्शन” लिहले जाते.

भारतामध्ये सध्यातरी मथुरा जंक्शन (७ मार्ग), सालेम जंक्शन (६ मार्ग), विजयवाडा जंक्शन (५ मार्ग), बरेली जंक्शन (५ मार्ग) ही काही मोठी जंक्शन स्थानके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *