सकाळची आरती घरात सकारात्मक उर्जा आणते आणि घरात शांतता राखते. कापूराच्या सुगंधाने घराची नकारात्मक उर्जा नष्ट होईल. कापूरमुळे वाईट स्वप्ने येत नाहीत.
कापूरचा सुगंध बॅक्टेरिया, विषाणू इत्यादींचा नाश करतो ज्यामुळे घराच्या हवेमध्ये रोगजंतु पसरत नाहीत. ज्यामुळे घरात आजार होण्याची शक्यता दूर होते.
ज्याला रात्री झोपायला त्रास होत असेल आणि रात्री झोपत नाही अशा सर्वांसाठी कापूर उपयुक्त आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळून घरात धूर करा. रात्री सहज झोप येण्यास ते मदत करते.
पाठीचा त्रास किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कापुराच्या तेलाने शरीरावर मसाज करा. शरीराच्या कोणत्याही भागात होणारा त्रास बरा होईल.
कापूर संधिवातदुखी देखील बरे करतो. यासाठी, संधिवातासाठी वापरल्या जाणार्या क्रीममध्ये कापूराचे चूर्ण मिसळा व वेदनादायक भागावर लावा .वेदना कमी होण्यास मदत होईल.
तेलामध्ये कापुर गरम करून ते केसांमध्ये वापरा. यामुळे केसतील कोंडा कमी होईल आणि उवांचा त्रासही कमी होईल.
केसांमध्ये कापूर तेल लावल्यास केस गळण्याची समस्याही संपते आणि केस लांब आणि खूप जाड होतात. कापूर तेलाने नियमितपणे केसांची मालिश केल्याने केस अधिक मजबूत होतात.
कपूर हा मुरुमांकरिता देखील खूप चांगला उपाय आहे. जर चेहरा खूप कोरडा असेल तर कापूर तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. याशिवाय कापूर त्वचेवरील लाल पुरळ देखील दूर करतो.
जेव्हा हवेमध्ये विरघळलेला कापूर त्वचेद्वारे शोषला जातो तेव्हा शरीरात मेंथोल सारखी शीतल भावना येते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. ज्यामुळे हात आणि डोळ्यांना त्रास होणार नाही.