कर्क राशींमध्ये सूर्य देवांचा प्रवेश होणार असल्यामुळे, या ७ राशींवर त्याचा परिणाम होणार….

। नमस्कार ।

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशि परिवर्तन करतो. तसेंच राशीचा हा बदल काही राशींसाठी सकारात्मक करतो आणि काही राशींसाठी नकारात्मक ठरत असतो. आता नुकताच 16 जुलै रोजी सूर्य देवांनी कर्क राशींत प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचा संबंध पिता, प्रशासकीय पद आणि समाजातील प्रतिष्ठा, मानसन्मान ज्यांच्याशी येतो. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या राशी परिवर्तनाचा सगळ्याच राशींवर परिणाम दिसून येईल. पण त्यापैकी 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी हा बदल लाभदायक ठरेल आणि 3 साठी नुकसानदायक. मग कोणत्या 3 राशीसाठी लाभदायक ठरेल आणि कोणत्या 3 राशीसाठी नुकसानदायक चला जाणून घेऊ या..

1. मिथुन राशी: सूर्यदेवाचे राशि परिवर्तन मिथुन राशीसाठी चांगला आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. तसंच तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही तुम्हाला वेळेवर मिळू शकतात. त्याबरोबर या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.

जर तुमचा व्यवसाय सूर्यदेव आणि बुध यांच्याशी संबंधित असेल, तर तुम्हाला या काळात चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील आणि कोणत्याही मोठ्या महत्त्वाच्या व्यवहारात चांगला नफा होईल. त्याचबरोबर तुम्ही एकमानी किंवा पाचू हे रत्न घालू शकता. कारण हे तुमच्यासाठी लकी ठरू शकतात पण त्याआधी तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्यायला विसरू नका.

2. कन्या राशी: कन्या राशीचा उत्पन्नात नक्कीच या राशी परिवर्तनाचा बदलाने चांगली वाढ होईल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे शोधही निर्माण होतील. व्यवसायात अचानक आर्थिक लाभही होतील. मालमत्तेत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. याशिवाय तसंच प्रॉपर्टी डीलिंग आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला फायदा होईल.

तुमचे नवीन व्यावसायिक संबंध सुद्धा निर्माण होतील ते तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकतील. कन्या राशीवर बुधाच राज्य आहे. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या सूर्यदेव आणि बुद्धी यांच्या मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सुर्यदेवांची हे राशि परिवर्तन नक्कीच तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही पाचू रत्न प्रदान करू शकता. तज्ञ ज्योतिषाचा सल्ला मात्र नक्कीच घ्या.

3. तुळ राशी: सूर्य देवांचे राशि परिवर्तन तूळ राशीसाठी सुद्धा अनेक महत्त्वाचे बदल घेवून येईल. त्यामुळे तुम्हाला अनेक नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. नोकरीमध्ये तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते. दरम्यान तुमची कार्यशैली सुद्धा सुधारेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये टाळ्या मिळू शकतील. त्याच बरोबर कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून सहकार्य सुद्धा मिळू शकेल.

व्यवसायात सुद्धा चांगला नफा होऊ शकतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. तर दुसरीकडे मीडिया, फिल्म लाईन, बँकिंग आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच फायदेशीर आहे.

4.कर्क राशी: नोकरदार लोकांसाठी चिंतेचा काळ असल्यामुळे सध्या कोणत्याही वादात पडणे टाळा. कारण त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या वागण्यामुळे लोकांचे तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये कोणती तरी गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.

5. सिंह राशी: तुमचे कोणते तरी रहस्य उघड झाल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू होवू शकते. तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवा. घरात अशांततेचा वातावरण राहण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. नवीन गुंतवणूक टाळा. कुणालाही कर्ज देण्यापूर्वी विचार करा.

6. मकर राशी: या वेळी तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल, तर एकदा विचार करा. तुमच्या चुकीच्या निर्णयाचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. खर्च वाढतील, परिणामी आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टी जरा जपून वापरल्या तर बरं होईल.

7. मीन राशी: सामसप्तक योग तयार होताच, तुमचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते आणि कर्ज वाढण्याची शक्यता आहे. अपघात होवू नये, म्हणून आधीच काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published.