ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू शोधत आहेत ट्रक ड्रायव्हर्सना , समोर आलं अस कारण जे…..

। नमस्कार ।

जपानमध्ये टोकियो शहरात चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकून भारताला पदकांचे खाते उघडून दिले होते. मीराबाई चानूच्या या यशाने जीवनात कितीही अडचणी , समस्या आल्या तरी तुमची तुमच्या स्वप्नासाठी इच्छाशक्ती जास्त असेल तर त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही हे दाखवून दिले आहे.

पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू ही भारतात आली तेव्हा तिचे एअरपोर्टवर जोरदार स्वागत झाले. तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला. दरम्यान, तिचा जीवन प्रवास पाहिल्यास इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने किती मेहनत घेतली होती हे आपल्याला दिसून येईल.

दरम्यान, तिच्या प्रशिक्षणच्या काळात तिला अनेक लोकांनी मदत केली आहे. त्यात ट्रक ड्रायव्हर्सचा ही भाग आहे. त्याच तिला मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा सध्या मीराबाई चानू ही शोध घेत आहे. हे ट्रक ड्रायव्हर चानू यांना तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील तिच्या घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज सोडत असत तो ही कोणताही मोबदला न घेता.

मीराबाई चानूचे कुटुंब अनेक अडचणींचा सामना करत संघर्ष करत जीवन जगत होते. चानूच्या प्रशिक्षणासाठी लागणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. चानूच्या घरापासून प्रशिक्षण केंद्र तरी जवळपास ३० किलोमीटर लांब होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात. हे पैसे पुरेसे नसत. अशा परिस्थितीत चानूने एक मार्ग शोधून काढला होता. ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायवरांकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून प्रशिक्षण केंद्रामध्ये जात असे.

काही दिवसांनंतर रोज ये जा होत असल्यामुळे हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचता येत असे.

काही दिवसांनंतर चानू आणि ट्रक ड्रायव्हर्समध्ये एक वेगळ्याच प्रकारचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. ड्रायव्हर दूरून हॉर्न वाजवत येत असत त्यामुळे ते तिच्या घरापासून किती जवळ आले आहेत , हे तिला समजत असे. हे ट्रक ड्रायव्हर तिच्याकडून कधीही भाड्याचे पैसे घेत नसत. त्यामुळे जे पैसे तिला प्रवासखर्चासाठी मिळत, त्यामधूनच चानू सरावादरम्यान, काही खाद्यपदार्थांची खरेदी करत असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *