एकाच क्षणात या माणसाने उलटवला भु’ताचा डाव, पहा माणसाशी पंगा घेणं भुताला चांगलंच पडलं महागात…

। नमस्कार ।

जळगावामधील रस्त्यावर दिसलेल्या त्या धड नसलेल्या भु’तांची चर्चा अजूनही सर्वत्र ठिकाणी चालू आहे. जळगावमधील तो भुतांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या त्या तरुणांवरही पो’लिसांनी का’रवा’ई केली आहे. त्याचदरम्यान आता सोशल मीडियावर अजून एक भुताचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात चक्क एका सामान्य माणसाने भुताचाच डाव त्या भुतावरच उलटवून लावला आहे.

खरच भू’त असतात की नाही याबद्दल अजून पूर्ण माहिती नाही. काही जणांना तर भू’त आहे असा विश्वास आहे, तर काही जण यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. पण सोशल मीडियावर भुतांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होताना आपल्याला दिसतात. यातील काही विडिओ खरेही असल्याचा दावा केला जातो, तर काही चित्रपटातील सिन असतात तर काही प्रँक म्हणून केलेले असतात. असाच हा एक व्हिडीओ आहे.

या व्हिडिओमध्ये दिसेल की या भुताने एकदम त्या माणसाशीच पंगा घेण्याचा प्रयत्न केला पण तो भुतालाच भारी पडला आहे. भुताचा डाव त्याच्यावरच उलटला आहे. कसा तो दिसेल या मजेशीर व्हिडिओमध्ये.

व्हिडीओमध्ये पाहू शकाल की एका बिल्डिंगमधील लिफ्टच्या बाहेर भु’ताच्या पांढऱ्या कपडे परिधान करून केस मोकळे सोडलेली एक महिला उभी आहे. तिथून जितके लोक ये जा करत होते ते सर्वजण त्या महिलेला पाहताच घाबरतात. त्या महिलेला पाहून त्या सर्वानाच घाम फुटतो. भू’त भू’त म्हणत ते घा’बरून ओरडत तिथून पळ काढतात. सुरुवातीला दोन महिला येतात. त्यापैकी दोन्ही दोन दिशेने पळून जातात.

त्यानंतर तिसरा पुरुष येतो. तोसुद्धा सुरुवातीला एकदम दचकतो आणि लगेच आपल्या छातीवर हात ठेवतो. पण तो तिथून पळत नाही तर मोठ्या धाडसाने त्या महिलेकडे पाहत पाहत पुढे चालतो. त्याला काहीतरी गडबड असल्यासारखा संशय वाटतो. आणि तो पुढे जाऊन पुन्हा मागे येतो आणि त्या भूत बनलेल्या त्या महिलेला जोरात किक मारतो. ती महिला धाडकन जमिनीवर कोसळते आणि तिची पोलखोल होते आणि तिथेच तिचा भुताचा खेळ खल्लास होतो.

हा एक प्रँक व्हिडीओ आहे, हे आता तुम्हालाही समजलं असेल. त्यामुळे हा व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला जात होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला भू’त पाहून तुम्हालाही थोडी भीती वाटली असेल. पण व्हिडीओचा शेवट पाहून हसूही बिलकुल आवरलं नसेल. siraaaposts इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *