मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. पाण्याबरोबरच तो कधी कधी जमिनीवरही प्राण्यांची शिकार करतो.
असे अनेक व्हिडिओ पाहण्यात आले आहेत ज्यात मगर कधी अजगराशी तर कधी हत्ती आणि सिंहाशी लढताना दिसत आहे.
पण आता एक व्हिडिओ समोर आला आहे,जो अत्यंत वायरल होत आहे. ज्यामध्ये एक महाकाय मगर एका व्यक्तीच्या शरीरावर चढत आहे. यानंतर, तो अशी कृत्ये करतो जी सहसा लोकांना दिसत नाही.
माणसावर मगरीचा फास
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जमिनीवर कशी पडून आहे, हे दिसत आहे. दरम्यान, एक भयानक मगर त्याच्या जवळ रेंगाळत येते व त्या व्यक्तीच्या अंगावर चढते.
View this post on Instagram
मगर आता त्या व्यक्तीला आपला शिकार बनवेल, असे सर्वांना वाटते. पण या व्हिडिओमध्ये मगर आपल्या स्वभावाविरुद्ध वागते आणि त्या व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव करू लागते. व्हिडिओ पाहून ही मगर पाळीव प्राणी असेल असे म्हणता येईल.