। नमस्कार ।
ओम नमः शिवाय, आपल्या घरात लावलेल्या आरशामुळे अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. तसेच जर आरसा आपल्या घरामध्ये योग्य दिशेने असेल तर तुमची प्रगती होऊ शकते. याच बरोबर आरसा जर चुकीच्या दिशेला असेल तर तुमची अधोगती देखील होऊ शकते. कारण सौभाग्य, वैभव आणि आनंद आकर्षित करण्याची ताकद या आरशामध्ये असते.
परंतु जर तुम्ही ज्या ठिकाणी असेल ती जागा वास्तुशास्त्रानुसार योग्य नसेल तर त्याचे वाईट परिणाम ही घरातील सदस्यांना होऊ शकतात. जर आपल्या घरातील आरसा हा चुकीच्या पद्धतीने लावला तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील सदस्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात.
त्यामुळे वास्तू शास्त्रानुसार आपण घरामध्ये कोणत्या जागेवर आरसा लावला पाहिजे, आरसा लावण्याची दिशा नेमकी कोणती आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तर वास्तू शास्त्रानुसार, घरातील आरसा हा नेहमी उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच आपल्या घराच्या ईशान्य कोपर्याला लावायला हवा.
आरसा हा कधीच पश्चिम व दक्षिण दिशेला लावू नका, कारण आरशामध्ये किरण परावर्तित करण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणूनच तुम्ही उत्तर व पूर्व दिशांना आरसा लावला तर दक्षिण व पश्चिम या दिशाकडून येणारी उर्जा त्यातुन परावर्तीत होते आणि जर तो असाच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावला तर पूर्वेकडून येणारी उर्जा त्यातुन परावर्तीत होईल आणि त्यामुळे ही ऊर्जा घरातून निघून जाईल.
त्यामुळे अशा वेळी लक्षात ठेवा की, उत्तर व पूर्व दिशेला जर आरसा लावला तर यामुळे तुमच्या घरात धन,ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा येवून, तुमची आर्थिक उन्नती होईल. तसेच जर हा आरसा दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण येतील. गंभीर आजारांना सामोरं जावं लागेल. घरातील आजारपण हटणार नाही. याशिवाय दक्षिण दिशेला आरसा लावल्याने तुम्ही राहू-केतूच्या प्रभावाखाली येऊ शकता.
तसेच पश्चिम दिशेला लावला तर तुमच्या घरामध्ये कटकटी, भांडण होण्याची शक्यता असते. याशिवाय कोणत्याही कामामध्ये मन लागणार नाही. नेहमी उदास वाटेल, त्यामुळे यासारख्या अनेक समस्या तुमच्या घरामध्ये निर्माण होवू शकतात. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनात सुद्धा वेगवेगळ्या समस्या सतावत असतात. तसेच नोकरी संदर्भातील अडचणी सुद्धा निर्माण होतात. या चुकीच्या दिशेला आरसा लावल्यामुळे नातेवाईकां सोबतचे संबंध देखील बघडू शकतात.
तसंच कामांमध्ये अपयश निर्माण होतं. जर आपण नको त्या दिशेला आरसा लावला तर घरातील सदस्यांना घरामध्ये थांबण्याची इच्छा होत नाही आणि घरामध्ये विनाकारण खर्च होऊ लागतो आणि या वाढणाऱ्या खर्चामुळे जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याच बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आरसा हा कधीही अंधार असलेल्या खोलीमध्ये लावू नये. कारण यामुळे तो आरसा आपले जीवन सुद्धा अंधारमय करुन टाकतो आणि म्हणून घरातील आरसा नेहमी स्वच्छ असायला हवा. असं सुद्धा म्हटलं जातं की, आरसा फुटला तर आपलं भाग्य सुद्धा फुटते.
त्यामुळे जर घरातील आरसा हा फुटलेले असेल तर त्वरित बदलून टाका. त्या ठिकाणी नवीन आरसा लावा, कारण अशा फुटलेल्या आरशा मधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. याशिवाय, रात्री झोपताना सुद्धा त्या आरसामध्ये आपल्या बेड दिसत असेल तर यामुळे सुद्धा आपल्या घरातील जो मुख्य सदस्य आहे त्याच्या मनावर नेहमी तान राहतो आणि जर या बेडवर पती-पत्नी सोबत तरी या दोघांचाही वैवाहिक जीवन हे नेहमी तनवाणी ग्रस्त राहत.
या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत राहतात. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण बेडवर झोपतो तेव्हा आपल्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशा वेळी जर आपल्या बेड समोर असेल तर ती ऊर्जा आरसामधून पुन्हा आपल्याकडे परावर्तित होत असते आणि पुन्हा आपल्या शरीराकडे नकरात्मक उर्जा येऊ लागते आणि यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. जर वर्ष- सहामहिने तुम्ही असा आरशासमोरच रात्रभर झोपत असाल तर तुम्हाला एखादा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आरसासमोर रात्री लावून ठेवावा. तर हे होते चुकीच्या दिशेला आरसा लावण्याचे परिणाम.
आता पाहुया आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला आपण आरसा लावावा, ज्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला मिळू शकतात. जेवणाच्या खोलीमध्ये आरसा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तुमची जी बैठकीची खोली आहे त्या खोलीमध्ये देखील आरसा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. शक्यतो हॉलमध्ये अष्टकोणी लावण्याचा प्रयत्न करावा आठ दिशांचे प्रतीक असल्याने त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो, यामुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या ठिकाणचे वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहतं. तुमच्या घरामध्ये जर चुकीच्या ठिकाणी आरसा लावला असेल तर त्वरित तिथून काढून टाका..