आपली अंडी वाचवण्यासाठी हा पक्षी भिडला चक्क किंग कोब्रा सोबत , नंतर जे घडलं , बघा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर किती तरी प्रकारचे विडिओ वायरल होत असतात. त्यापैकी काही मजेशीर तर काही अंगावर काटा आणणारेदेखील असतात. त्यात कोणत्या ऍकसिडेंटचे , प्राण्यांचे विडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात.

या विडिओ मध्ये अंडी वाचवण्यासाठी एक मादा पक्षी किंग कोब्राशी भांडलेली असताना दिसून येत आहे. इंटरनेट मध्ये सोशल मीडिया हे असे एक जग आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात.  काही व्हिडीओ असे असतात की जे आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात, काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून आपले हसू आवरता येत नाही, तर काही व्हिडीओ असे असतात की ज्यांच्यामुळे घाबरून आपले अंगावर काटे उभे राहतात.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ जगातील सर्वात धोकादायक साप किंग कोब्राचा आहे.  हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हे देखील समजेल की किंग कोब्रासोबत सामना करणे किती धोकादायक आहे.

घरट्यात घातलेली अंडी वाचवण्यासाठी एक छोटा पक्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका विषारी किंग कोब्राशी कसा लढतो हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.  व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महाकाय किंग कोब्रा झाडाला लटकलेल्या घरट्यात कसा गुंडाळलेला आहे.  किंग कोब्राने घरटे पूर्णपणे ताब्यात घेतले आहे.

नीट बघितल्यावर समजेल की, नागाने आपल तोंड फणा करून घरट्यात टाकल आहे, तेव्हाच शेजारी घिरट्या घालणाऱ्या पक्ष्याला आपल्या अंड्याची काळजी वाटते आणि कोब्राला न घाबरता आणि जीवाची पर्वा न करता तो किंग कोब्राशी पंगा घेतो.  पक्षी कोब्राभोवती जोरात घिरट्या घालू लागतो, त्यामुळे विषारी नाग तिथून पळून जातो.

  (@nature27_12) द्वारे शेअर केलेली पोस्ट त्यामुळे एका धोकादायक सापालाही एका लहान पक्ष्यासमोर कशी हार मानावी लागली हे तुम्ही पाहिले.  पक्षी असो वा मानव, आई ही आई असते, ती आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी कोणाला घाबरत नाही आणि जीवाची पर्वा न करता कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असते.  लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत.  एका यूजरने लिहिले – कधीही हार मानू नका.  दुसर्‍याने लिहिले – शूर पक्षी जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *