….आणि त्याने काही मिनिटातच घर तयार केलं ; बांधकामाची ‘ही’ कला पाहून व्हाल चकित! बघा विडिओ

। नमस्कार ।

जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वतःसाठी कमावायला सुरुवात करते, तेव्हा तो प्रथम त्याचे स्वतःचे हक्काचे घर बांधण्याचं स्वप्न पाहतो आणि विचार करत असतो की त्या घरात तो आपल्या कुटुंबासह गुण्यागोविंदाने राहू. सध्याच्या जमान्यात घर किंवा फ्लॅट घेण्यासाठी माणसाला लाखो आणि करोडो रुपये जमा करावे लागतात आणि कोणतेही घर तयार व्हायला बरेच महिने किंवा वर्षेदेखील लागतात.

लोक खूप मेहनत घेऊन स्वतःसाठी घर बांधत असतात आणि त्यात वर्षानुवर्षे राहतात. कधी कधी कोणत्याही व्यक्तीच्या तीन ते चार पिढ्या त्याच घरात राहतात. चला तर आज आम्ही तुम्हाला असे घर दाखवणार आहोत , ज्याच्या तयारीला खूप कमी वेळ लागतो.

कंटेनरपासून बनवलेले घर :- होय हे खरं आहे, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की एक मोठा आणि उंच कंटेनर त्याच्या दुप्पट आकाराचा बनविला आहे आणि तो स्वतःच्या आकारानुसार दुमडला आणि उघडला जाऊ शकतो.

हे कॉम्पॅक्ट साइड हाउस बघून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. कंटेनर बॉक्सच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला एक फोल्ड करण्यायोग्य खोली बनवण्यात आली आहे, जी काही सेकंदात उघडून दोन खोल्या बनवता येतात. तुम्हाला हवे तेव्हा उघडून तुम्ही ते बंद सुद्धा करू शकता आणि याची रचना अगदी फ्लॅटसारखीच दिसत आहे.

फोल्डेबल घरांना बाजारात मागणी :- कंटेनर देखील आजूबाजूला कुठेही नेला जाऊ शकतो. त्या घराच्या खोलीमधील दृश्य देखील खूप सुंदर आहे. त्यात खिडक्या, दरवाजे, दिवे, सर्वकाही आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं चकितच झाले आहेत. एवढेच नाही तर लोक ते खरेदी करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही कुठे खरेदी करू शकतो.’ त्याच वेळी, काही नेटकरी विचारत आहेत की ते घर कसे बनवले आणि ते कुठून खरेदी करता येईल. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर गॅजेटग्राउंड नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *