l नमस्कार l
क्रिकेट हा खेळ सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते. परंतु बऱ्याच वेळा काही क्रिकेटपटू मैदानावर अस काही कृत्य करतात, ज्यामुळे क्रिकेटची नाचक्की होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. आणि या क्रिकेटमध्ये पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे नाव मात्र यासाठी कुप्रसिद्ध आहेच.
वसिम अकरम, वकार युनिस वा शाहिद आफ्रिदी अशा बऱ्याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे टीका झाल्या आहेत. एकदा असेच आफ्रिदीने २०१६ मध्ये रागारागात विरोधी संघाच्या गोलंदाजाच्या डोक्यावर बॅट मारली होती. पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील पेशावर जाल्मीकडून कराची किंग्जविरुद्ध खेळताना त्याने हे नको ते कृत्य केलं आहे.
पेशावर जाल्मी विरुद्ध कराची किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान तो आउट झाला या चिडीने आफ्रिदीने मुद्दाम त्या वेगवान गोलंदाज बिलावल भट्टी ला बॅट मारली होती.
काय होता तो विषय ? बघा इथे :- पाकिस्तान सुपर लीगमधील या चालू असलेल्या सामन्यात पेशावर जाल्मी संघाला १५३ धवांचं लक्ष दिलं होतं. ११.३ षटक होईपर्यंत त्यांचा संघ ३ बाद ६९ धावा अशा स्थितीत होता. पेशावर जाल्मी संघाकडून फलंदाजीसाठी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी मैदानावर खेळत होता.
यावेळी डावातील १२ वे षटक टाकण्यासाठी बिलावल भट्टी गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर आफ्रिदी पायचित झाला. यावर गोलंदाज बिलावलने पंचांकडे पाहत त्यांच्याकडे जोरदार अपील करत मागच्या दिशेने पळत होता आणि दुसरीकडे आफ्रिदी धाव घेण्यासाठी पळत होता. परिणामी आफ्रिदी आणि बिलावलची धडक होऊ शकली असती.
परंतु आफ्रिदीने आउट झाल्याच्या चिडीने बिलावल आपल्यापुढे येत असल्याचे पाहून त्याला जोराने बॅट मारली आणि धक्का दिला. त्यानंतर तो त्याची माफी मागण्यासाठी त्याच्याजवळही गेला. बॅट मारल्यानंतर मैदानावर कोसळलेला बिलावल काही वेळ दुःखात दिसला. परंतु नंतर तो उठून गोलंदाजीस सज्ज झाला. इतका ड्रामा केल्यानंतर अखेर पंचांनी आफ्रिदीला बादच दिले.
आफ्रिदीने संघ सहकाऱ्याशीही केला होता विवाद :- इतकेच नव्हे तर, आफ्रिदीने त्याच्या संघ सहकाऱ्यांसोबतही वाद घातला होता. त्याच्यामध्ये आणि शोएब अख्तरमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणात अख्तरने आफ्रिदीला बॅट मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो खाली वाकल्यामुळे बॅट मोहम्मद आसिफला लागली होती.