l नमस्कार l
सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करून वायरल केले जातात. ते कधी कोणत्या प्राण्याचे तर कधी माणसाचे असतात. आणि लोक ही ह्या व्हिडिओज ना पसंती दर्शवतात. त्यात काही मजेशीर तर काही काळजाचा ठोका चुकवणारे सुद्धा असतात.
प्रत्येक व्यक्तीला मोकळ्या हवेशीर उद्यानामध्ये, शहराच्या बाहेर किंवा मग नॅशनल पार्कमध्ये जाऊन खेळायला , बसायला , फिरायला आवडतं. कित्येक लोकांची घरे तर जंगलाशेजारी किंवा नॅशनल पार्क जवळ असतात. त्यांच्या आजूबाजूला शेजारी वाघ, बिबट्या असे प्रकारचे काही हिंस्र प्राणी येऊन तेथील छोट्या छोट्या मुलांना पळवून लावतात.
कितीतरी वेळा लहान मुलांवर ह’ल्ला झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ नेचर नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या वायरल व्हिडीओमध्ये पाहू शकाल की , एक छोटा मुलगा आपल्या वडिलांसोबत बागेत खेळायला आलेला असतो.
पण वडिलांची नजर आपल्या मुलावरून बाजूला होताच एका गरुडाने त्या चिमुकल्या ह’ल्ला केला. त्या मुलाला घेऊन हा पक्षी जमिनीपासून आकाशात उंच भरारी घेतो तेव्हाच मुलाच्या वडिलांची त्याच्यावर नजर पडते आणि ते पक्ष्याच्या तावडीतून आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटतात.
हे पाहताच पक्षीही घाबरतो आणि तो त्या मुलाला तिथेच सोडतो. जसा तो त्या लहान मुलाला सोडतो तसा मुलगा जमिनीवर पडतो. पण जमिनीपासून अंतर फार जास्त नसल्या कारणामुळे मुलाला काही होत नाही. त्याचे वडील त्याच्याजवळ जातात आणि त्याला आपल्या कुशीत घेतात. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स जरा भाऊक आणि हैराण ही झाले आहेत.