आई ही आई असते ! मुलाला वाचवण्यासाठी ही आई बनली सुपरमॉम , बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

। नमस्कार ।

आपल्या मुलांवर आई ज्याप्रमाणे प्रेम करते तस प्रेम कोणीही कोणावरही करू शकत नाही. आई शेवटी आई असते. मग ती माणसाची असो वा प्राण्यांची. आपल्या मुलांना कोणत्याही अवघड प्रसंगापासून वाचवण्यासाठी ती एक विशिष्ट दैवी रूप घेते.

एक अशी म्हण प्रचलित आहे की, देव सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून देवाने आईची निर्मिती केली आहे. आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकते, याचा प्रत्यय दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आई आणि तिच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओतील आईचे सर्वजण काैतुक करताना दिसत आहे. असं म्हणतात की आईकडून तीच मूल कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. समोर यमदेव जरी उभा असला तरी. या व्हिडीओमध्ये एक मूल जिन्यावरून खाली पडणार होते. मात्र, आई आपला स्वत: चा जीव धोक्यात घालून आणि एक सुपरमॉमप्रमाणे आपल्या लेकराचा जीव वाचवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि एक महिला आपल्या मुलासह लिफ्टमधून बाहेर येताना दिसत आहे. यानंतर ती महिला तिथे जवळच्या कोपऱ्यात जाऊन उभी राहते. मग ते मूल जिन्याकडे जाऊ लागतं. मात्र, आपले मूल कुठे जात आहे, याकडे त्या आईच बारकाईने लक्ष असते. तितक्यात तो छोटा मुलगा खाली वाकून बघण्याच्या नादामध्ये त्याचा तोल जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meme wala (@memewalanews)

हेच ती आई पाहते आणि ती सुपर माॅम होऊन आपल्या लेकराला पकडते. आईने वाचवलेल्या आपल्या मुलाचे प्राण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेसोबत लिफ्टमध्ये आलेला माणूस मुलाला पडताना पाहून पायऱ्यांवरून खाली पळताना दिसत आहे. यादरम्यान महिला आणि मुलाच्या ओरडणं ऐकून अनेक लोक तिथे येतात आणि त्या महिलेची मदत करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की या जगात देवानंतर कोणी असेल तर ती आईच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *