। नमस्कार ।
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात आणि असेदेखील व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्या मनाला स्पर्श करून जातात.
मात्र जेव्हा एखाद्या आईचा म्हणजे मग ती आई कोणाचीही असो माणसाची असो वा प्राण्यांची तिचा कोणताही भावनिक करणारा व्हिडिओ आपल्या समोर येतो, तेव्हा नकळतपणे सर्वांच्याच डोळ्यात पाणी उभं राहतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल. हा व्हिडिओ जंगलाची राणी असलेल्या एका सिंहिणीचा आहे, जी आपल्या बछड्यांना अडचणीत पाहून लगेचच त्यांच्याजवळ मदतीसाठी पोहोचते.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की सिंहिण आणि तिचे दोन अतिशय छोटे बछडे नदीच्या काठावर उभे होते. तेव्हाच त्यांचा तिथे तोल जाऊन खाली कोसळतात. त्यामुळे ते एका खड्ड्यातून वरती येण्यात अपयशी होत आहेत.
अशात जेव्हा सिंहिणीची नजर आपल्या बछड्यावर पडते तेव्हा ती क्षणाचाही विलंब न करता आपल्या बछड्यांच्या मदतीसाठी खाली उतरते आणि त्यांना आपल्या जबड्यात पकडून वरती चढवते. एका आईची आपल्या मुलांसाठी सुरू असलेली ही धडपड पाहून नेटकऱ्यांना आपआपल्या आईची फारच आठवण होत आहे.
Whenever you are down, have faith in your mother💕 pic.twitter.com/7QJeowR1c4
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 27, 2022
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 39 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला त्यांनी सुंदर कॅप्शनही दिलेलं आहे. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या स्वतःच्या प्रतिक्रियाही देत आहेत.
सोशल मीडियावर नेटकरी या आई आणि पिल्लांमधील या बॉन्डिंगला जास्तच पसंती दर्शवत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, आई आईच असते, जी स्वतः काहीही सहन करू शकते. मात्र मुलांसाठी प्रत्येक गोष्ट सहन करू शकते. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, हृदयाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ, एक आई अशीही असते. लव्ह यू आई. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.