। नमस्कार ।
‘आई कुठे काय करते‘ या सिरियलने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. इतकेच नव्हे तर या मालिकेतील सर्वच काम करण्याऱ्या कलाकारांना प्रेक्षकांचे खूप प्रेमदेखील मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक असतात.
या मालिकेत आई या पात्राची म्हणजेच अरुंधती देशमुखची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ह्यांनी साकारली आहे. त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसत आहे. मधुराणी प्रभुलकर यांनी इंस्टाग्रामवर अलीकडेच स्वतःचा बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या खूपच सुंदर दिसत आहेत.
त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडलेला दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चांगल्या कमेंट्सचा वर्षाव होतोना दिसत आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने या मालिकेपूर्वी ‘इंद्रधनुष्य‘ , ‘असंभव‘ या मालिकेतही काही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर ‘सुंदर माझं घर‘, ‘गोड गुपित‘, ‘समांतर, ‘नवरा माझा नवसाचा‘, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या मराठी चित्रपटातही ती काम करताना दिसली आहे.
तिने ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे. याबद्दल मधुराणीने मुलाखतीत सांगितले की, इतका मोठा ब्रेक घेण्यामागे कारणदेखील खास आहे. तिला ६ वर्षांची मुलगी आहे आणि तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून तिने मोठा ब्रेक घेतला होता. आता तिला आई कुठे काय करते या मालिकेचा विषय आणि मांडणी आवडल्यामुळे मधुराणीने या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला.