आईने केली मुलीला मारहाण, हे पाहून आला कुत्र्याला राग, मिठी मारून वाचवले तिला, लोकं बोलली -“ हेच आहे खरं प्रेम”

नमस्कार

असे म्हटले जाते की कुत्रा हा सर्वात विश्वासू प्राणी आहे.  मालकाशी एकनिष्ठ राहण्यासाठी तो आपला जीव देखील धोक्यात घालु शकतो. कुत्रा निष्ठावान प्राणी आहे असे अनेक किस्से आपण ऐकले किंवा वाचलेही असतील. परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये कुत्रा आणि  त्याची मालकीण यांमध्ये असलेले प्रेम आणि आपुलकी पाहून कोणाचेही हृदय पाझळेल आणि डोळे भरून येतील.

  व्हायरल व्हिडिओमध्ये आपण हे पाहू शकता की एक महिला कुत्र्याला दाखविण्यासाठी आपल्या मुलीला काठीने मारत आहे. तर कुत्र्याला वाटते की ती खरोखर मुलीला मारत आहे.  मुलीला महिलेच्या मारहाण करण्यापासून वाचविण्यासाठी कुत्रा मुलीला घट्ट पकडतो.

जेणेकरून तिची आई तिला मारू शकत नाही.  यासह, कुत्रा देखील महिलेच्या हातातून काठी काढून घेण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याने मुलीला इतक्या मनापासून वाचवताना पाहिले की ती स्त्री आणि मुलगी दोघेही आनंदाने हसतात आणि मुलगी प्रेमाने कुत्र्याला मिठी मारते.

  मुलगी आणि कुत्रा यांच्यातील हे प्रेमळ नाते आणि बंधन पाहून कोणाचेही हृदय भरुन येऊ शकते.

   हा हृदयस्पर्शी व्हिडिओ dogsopediaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रीलच्या स्वरूपामध्ये अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिला आतापर्यंत १३ लाखपेक्षा जास्त व्युव आले आहेत. व्हिडिओवर भाष्य करताना एका वापरकर्त्याने सांगितले की, “हे खरे प्रेम आहे.” तर दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले, “हे प्रेम अमूल्य आहे.”

बघा विडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *