। नमस्कार ।
सर्वसामान्यांना करोडपती होण्याची स्वप्न दाखवणारा एक प्रोग्राम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती‘ (सत्र १३). बिग बी म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांचं त्याच्याच कलेतील सूत्रसंचालन या कार्यक्रमाची चांगलीच शोभा वाढवत जाते.
दर शुक्रवारी या खास कार्यक्रमात कोणा एका प्रसिद्ध अभिनेता स्पर्धकाची हजेरी असते. त्याचवेळी कार्यक्रमातील बिग बी च्या समोर हॉट सीटवर आले होते, दिलखुलास अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी. दोन्ही कलाकारांच्यासोबत कार्यक्रम सुरु असतानाच एक वळण असं आलं जिथं अमिताभ, जॅकी दा आणि सुनील शेट्टी या तिघांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
जॅकी श्रॉफ यांच्या जीवनातील एका घटनेबाबत सांगणाऱ्या सुनील शेट्टीचा व्हिडीओ केबीसीच्या मंचावर लावण्यात आला होता. ‘दादा (जॅकी श्रॉफ)नं खुप सुरेख उल्लेख केला होता. जेव्हा एका खोलीच्या घरात राहत होतो, तेव्हा आईला खोकला आला तरीही एकू येत होता. जेव्हा मोठ्या घरात गेले, तेव्हा मात्र आईनं अखेरचा श्वास घेतलेला, ती कायमची गेलेली हेसुद्धा कळलं नाही’, असं त्या व्हिडीओमध्ये म्हटलं गेलं होतं.
व्हिडीओ सुरु झाल्यापासून जॅकी दा आणि सुनील शेट्टी यांचे डोळे पाणावले होते. जॅकी श्रॉफ यांना यानंतर हे सार काही सहन झाल नाही आणि त्यांना तिथे भर मंचावरच रडू कोसळले. तिथं समोरच्या दोन्ही कलाकारांना रडताना पाहून अमिताभ बच्चन यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
आईच्या निधनाची माहिती आपल्याला उशिरा मिळाली. अन्यथा आईचा जीव वाचवता आला असता असं जॅकी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण, नियतीपुढे साऱ्यांनीच हात टेकले आणि त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं.
बघा तो विडिओ :-