। नमस्कार ।
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात. विशेषत: प्राण्यांचे व्हिडिओ खूप पसंत केले जातात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोंबडीचे आपल्या पिल्लांवर किती प्रेम आहे हे पाहायला मिळत आहे. ही एक हृदयस्पर्शी पोस्ट आहे, जी पाहून अनेक लोक भावूक होत आहेत. यामध्ये कोंबडी अशा पद्धतीने आपल्या मुलांना पावसात भिजत वाचवत आहे. हे पाहून अनेक प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत.
हा व्हिडिओ Naturelife-ok नावाच्या युजरने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे “आईच प्रेम“. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे, विशेषत: कोंबडीच हे प्रेम सर्वांच्या हृदयाला भिडणारे आहे. भर पावसात कोंबडी उभी असल्याचे दिसून येते. जवळून पावसाचे पाणी वाहत आहे. यावेळी पावसात त्या कोंबडीने आपली पिल्ले भिजू नये म्हणून तिने पंख उघडे ठेवून उभी राहून आपल्या सर्व पिल्लांना आपल्या पंखाने झाकून ठेवले आहे, पावसाळ्यात तिने आपल्या पिल्लांची पूर्ण काळजी घेतली आहे, जेणेकरून त्यांचे जीवन जगू शकेल. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवले आहे. त्याचसोबत समुद्राजवळील पक्ष्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
नुकताच समुद्राच्या लाटांशी खेळताना लहान पक्ष्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा १५ सेकंदांचा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पक्षी लाटांसोबत कसे थट्टा-मस्करी करत आहेत, हे दिसत आहे. ते पाहून दोघेही एकमेकांचे पाय ओढत असल्याचा भास होतो.
Your dreams will navigate your path 😊😊 pic.twitter.com/0fy8IxwCNP
— Susanta Nanda (@susantananda3) October 11, 2021