अवघ्या 20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO

। नमस्कार ।

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी चक्क तीन मजली इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या काही सेंकदात बघता बघता एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. संबंधित थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. इमारतीत काही तांत्रिक दोष राहिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मालमत्तेचं बरंच नुकसान झालं आहे.

संबंधित घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात घडला आहे. पाच वर्षांपूर्वी संबंधित तीन मजली इमारत उभारण्यात आली होती. पण ही इमारत बांधताना काही तांत्रिक दोष राहीले होते. त्यातूनच हा अपघात घडला आहे. मुंबई येथील रहिवासी असणाऱ्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे गुंतवणूक म्हणून ही तीन मजली इमारत उभारली होती. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या  इमारतीला पावसामुळे तडा गेला होता.

इमारतीला तडा गेल्याने येथे राहाणाऱ्या  भाडेकरूंनी तातडीने इमारत रिकामी केली होती. दरम्यान काल रात्री दहाच्या सुमारास आलेल्या रिमझिम पावसामुळे ही इमारत अचानक कोसळली आहे. अवघ्या काही सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटेत कोणतीही  जीवितहानी झाली नाही.

विशेष म्हणजे, पाचोरा नगर परिषदने हा रोड यापूर्वीच बंद केला होता. ही घटना घडल्यानंतर कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.

बघा विडिओ :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *