अरे हा माणूस आहे की स्पायडरमॅन , हा 15 सेकंदाचा व्हिडिओ बघून व्हाल थक्क , बघा व्हिडिओ

l नमस्कार l

हॉलिवूड चित्रपटांमधील स्पायडरमॅन हे पात्र तर तुम्हा सर्वांना ज्ञातच असेल. सध्या सोशल मीडियावर एका गावठी स्पायडरमॅनचीही चर्चा रंगात आली आहे. स्पायडरमॅनसारखं भिंतीवर चढून पुढे जाणारा एक तरुण सध्या चर्चेत आला आहे.

त्याचं हे कौशल्य बघून सर्वजण चकित झाले आहेत. इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, काहीही अशक्य नाही हेच या गावठी स्पायडरमॅनने दाखवून दिलं आहे.

या तरुणाने रस्त्यात जास्तच चिखल असलेला भाग स्वतःच कौशल्य वापरून इतक्या सहजरित्या पार केला की त्याला थेट देशी स्पायडरमॅनच म्हटलं जाऊ लागलं. आपण विचारही करू शकत नाही ते या तरुणाने करून दाखवलं आहे

व्हिडीओमध्ये पाहू शकाल काय हा तरुण सायकलवर सामान घेऊन जात असताना दिसत आहे. तोच समोर अर्ध्या रस्त्यावर चिखल असतो. आता ही व्यक्ती या चिखलातून कशी जाणार हा विचार मनात येताच ही व्यक्ती मात्र त्यावर लगेच जुगाड लावते.

ही व्यक्ती सायकल हातात धरते आणि आपले दोन्ही पाय भिंतीला टेकवून पुढे निघाला. त्याच्या सायकलवर इतकं ओझ आहे, तरी ती सायकलचा आणि स्वतःचा तोल सावरत चिखलातून आणि स्वतः भिंतीवर चालत ही व्यक्ती चिखलाचा हा रस्ता अगदी सहजरित्या ओलांडते.

चिखल असलेला रस्ता पार करण्यासाठी या व्यक्तीने जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्याचं हे कौशल्य सर्वांनाच खूप आवडलं आहे. युझर्सनी यावर बऱ्याच कमेंट केल्या आहेत. इच्छा तिथं मार्ग, हा मुलगा फिजिक्सचा प्राध्यापक आहे, हा तर स्पाइडर मॅन आहे, अश्या भन्नाट प्रतिक्रियाही नेटिझन्सनी दिल्या  आहेत.

आयपीएस अधिकारी स्वाती लाकरा यांनी आपल्या स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. याला तुम्हीच कॅप्शन द्या असं त्यांनी म्हटलं आहे.  तुम्हाला या देशी स्पाडरमॅनच  टॅलेंट कसं वाटलं, तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कोणतं कॅप्शन सूचत आहे हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *