अरे बाप रे ! या २ चिमुकल्यांनी सापाच्या शेपटीला पकडल.. आणि…

कोणाच्याही साप समोर येताच प्रत्येकाचीच घाबरगुंडी उडते. सापाला स्पर्श करणे तर दूरच पण तो फक्त वळवळताना दिसला तरीही अनेकांना पूर्ण शरीरभर घाम फुटतो. मात्र बऱ्याचदा सापाला पकडणाऱ्या लोकांचे बरेच व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.हे असे व्हिडिओ बघून कोणत्याही व्यक्तीचा थरकाप उडेल. पण ती सापाला धरणारी व्यक्ती अगदी आरामात न घाबरता बिनधास्तपणे आपलं काम करत असते.

मात्र सध्या सोशल मीडियावर एक खूपच वेगळा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा सापाला सहजरीत्या त्याच्या शेपट्याला पकडून आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की लहान मुलगा ५ फुटाच्या लांब सापासोबत मजेशीर आणि निर्भयपणे खेळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अत्यंत वायरल होत आहे. मात्र हा बेजबाबारपणा या मुलासाठी अतिशय धो’कादायकही ठरू शकतो.

हा व्हिडिओ बघताना अतिशय भी’तीदायक आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात एक 5 फूट लांब साप रस्त्यावर सरपटत जाताना दिसत आहे. तेवढ्यातच एका लहान मुलाची नजर त्या सरपटणाऱ्या सापावर पडते. यानंतर हा मुलगा त्या सापासोबतच खेळू लागतो. तो परत परत सापाच्या शेपटीला धरून पकडू लागतो.

यानंतर काही क्षणातच अजून एक लहान मुलगा तिथे पोहोचतो आणि तो सुध्दा त्या सापाची शेपटी पकडून खेळण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान नशिबाने त्या सापाने या मुलांवर जराही ह’ल्ला केला नाही. अन्यथा याचे परिणाम अतिशय वा’ईटही होऊ शकले असते. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की हा लहान मुलगा सापाची शेपटी पकडून त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच तो साप त्या मुलाच्या हातातून निसटतो आणि पुढे सरपटत जाऊ लागतो. मात्र तो मुलगा परत एकदा त्या सापाची शेपटी पकडण्याचा प्रयत्न करतो.

 

View this post on Instagram

 

 

A post shared by Saurabh Jadhav 2110 (@rasal_viper)

सोशल मीडियावर साप आणि या मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर rasal_viper नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ सामाईक केला आहे.

अपलोड होताच अनेक वापरकर्त्यानी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही केल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त करत म्हटलं की हा खेळ चिमुकल्यासाठी जीवघेणाही ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *