। नमस्कार ।
काही लोक फेमस होण्यासाठी काहीही म्हणजे काहीही करण्यास एका पायावर तयार असतात. सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लग्नातील ती जोडपी लोकांच्या चर्चेत येण्यासाठी विचित्र किंवा वेगळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका नवविवाहित जोडप्याचा एक रिल्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव दोघेही ब्राइडल आउटफिटमध्ये दिसत आहेत. दोघंही समुद्राच्या मधोमध एक होडीवर एकमेकांचा हात धरून उभे आहेत. अशात दोघांच्या मनात काहीतरी येतं आणि ते अचानक समुद्रात उडी घेतात.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढे असं समजतं, की नवरी आणि नवरदेव इतकी रिस्क केवळ वेडिंग फोटोशूटसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी घेत आहेत. त्यांना या गोष्टीची कदाचित कल्पना होती, की काहीतरी विचित्र कृत्य करूनच आपण चर्चेत येऊ आणि त्यांना याठिकाणी यापेक्षा चांगली दुसरी आयडिया सुचली नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ८२ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर कमेंटही केल्या आहेत.
बघा विडिओ :-
View this post on Instagram