अचानक रस्त्यावरून घसरायला लागल्या अनेक दुचाक्या, व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चूकेल , नक्की बघा.

l नमस्कार l

व्हायरल व्हिडीओ : दुचाकी अचानक घसरल्याने वाहने भरधाव वेगाने रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येते. फ्रेममधलं हे दृश्य असं आहे की कुणीही बघून घाबरेल.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. कारण सोशल मीडिया एकापेक्षा एक व्हिडिओंनी भरलेला आहे. हे असे व्यासपीठ आहे जिथे लाखो व्हिडिओ पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यातील काही तर असे असतात की नेटकऱ्यांचे डोळे पाणावतात. तर काही व्हिडिओ खूप काही शिकवतात.

असाच एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि शिकायलाही मिळेल. वास्तविक हा व्हिडिओ एका उड्डाणपुलाशी संबंधित आहे जिथे वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. मात्र या उड्डाणपुलावर अचानक दुचाकी घसरायला लागल्या.

दुचाकी अचानक रस्त्यावर घसरू लागल्या :- समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फ्लायओव्हरवरून चारचाकी आणि तीन चाकी वाहने आरामात जात असल्याचे दिसून येते. मात्र दुचाकी सतत घसरत आहेत. यामध्ये अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. कुणाच्या हाताला दुखापत झाली तर कुणाचे तोंड फुटले. सुमारे दहा सेकंदांच्या व्हिडिओमध्ये उड्डाणपुलावर येणाऱ्या सर्व दुचाकी घसरल्या. व्हिडीओमधलं हे दृश्य असं आहे की, कुणीही ते पाहून घाबरून जाईल.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

A post shared by Gidda company (@gieddee)

नक्की कारण काय आहे ? :- पावसामुळे उड्डाणपुलाच्या उतारावर येताच दुचाकी घसरायला लागल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ gieddee नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आला आहे ज्याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पाऊस पडला की रस्ता निसरडा होतो हे व्हिडिओ पाहून कळते. त्यामुळे दुचाकींचा वेग कमी ठेवावा जेणेकरून अपघात टाळता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *