तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की, तीन चित्त्यांसोबत झोपलाय एक व्यक्ती. हा! हा! एक नव्हे तर तब्बल तीन तीन चित्त्यांच्या शेजारी एक व्यक्ती झोपलाय.
खूप माणसांना प्राण्यांबद्दल खूप जिव्हाळा व आपुलकी असते. तर त्यातील खूपजण त्यांना पाळतात आणि काहीजण तर त्यांना घरातलाच सदस्य असल्याप्रमाणे वागणूक देतात.
त्याचप्रमाणे हे प्राणी देखील त्यांच्या मालकावर तेवढेच प्रेम करतात. परंतु आजचा वायरल होणारा व्हिडिओ खुपच वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक व्यक्ती तब्बल तीन तीन चिंत्याच्या बाजूला झोपी गेला आहे.
कोणताही प्राणी कितीही साधा असो किंवा भयानक असो आपण जर त्याला प्रेम दिले तर तोही आपल्याला मोबदल्यात प्रेम आणि आपुलकीच देईल. सोशल मीडियावर सध्या हे खूप पाहायला मिळत आहे की, वाघ ,सिंह, चित्ते इ. सारखे भयानक प्राणी लोकं पाळतात किंवा त्यांच्याशी लोकं कुत्रा मांजराप्रमाणे वागतात.
अश्याच संबंधित एक विडिओ सध्या सोशल मिडयावर खूपच वायरल होत आहे. एक व्यक्ती तीन तीन चित्यांसोबत झोपलेला दिसत आहे. सर्वप्रथम यातील एका चित्त्याला थंडी वाजत असल्याने तो मालकाजवळ जाऊन झोपतो. तर त्याला पाहून दुसरा चित्तादेखील मालकाच्या जवळ जातो व त्याच्या पायाशी निजातो. आणि साहजिकच तिसारही मालकाजवळ जाऊन झोपतो.
View this post on Instagram
आणि नवलाची अजून एक गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ चक्क सुनील ग्रोवर (Sunil Grover) या प्रसिद्ध कलाकाराने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेयर केलेला आहे .तसेच हा व्हिडिओ लोकांना खुपच आवडत आहार.
या व्हिडिओला आतापर्यंत १.५ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलेले आहे .तसेच खूप लोक हा व्हिडिओ शेयर करीत आहेत. तर बहुतेक युजर्सनीं कंमेंट देखील केल्या आहेत. माणूस आणि चित्ता यांच्यातील असं नातं पाहून लोकही खूप चकित झाली आहेत.